हक्कासाठी गुरूदेवभक्त न्यायालयात जाणार

By Admin | Updated: May 15, 2014 02:07 IST2014-05-15T02:07:32+5:302014-05-15T02:07:32+5:30

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दुरदृष्टीकोन ठेवून अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाची सोय निर्माण करण्यासाठी शाळा उघडली.

To the right, go to Guru Dutt's court | हक्कासाठी गुरूदेवभक्त न्यायालयात जाणार

हक्कासाठी गुरूदेवभक्त न्यायालयात जाणार

पत्रकार परिषद : संस्थापकाकडून दिशाभूल

गडचिरोली : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दुरदृष्टीकोन ठेवून अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाची सोय निर्माण करण्यासाठी शाळा उघडली. काही दिवसानंतर ही शाळा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वत: संस्थेकडे हस्तांतरीत केली. या आo्रमशाळेच्या मालकीचा प्रश्न शासन दरबारी कायम आहे, असे असतांनाही आत्राम यांनी शाळा इमारतीचे बांधकाम सुरू करून शासन, धर्मदाय आयुक्त व गुरूदेव भक्तांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे सचिव डॉ. एस. बी. कुंभारे यांच्यासह उपस्थित गुरूदेव भक्तांनी केला.
कमलापूर आo्रमशाळा ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज o्री गुरूदेव बहुद्देशिय शिक्षण संस्था कमलापूरला हस्तांतरीत करण्याचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी लेखी स्वरूपात पत्र देऊन कबुल केले होते. शासन दरबारी असलेले अनेक मंत्री, वरीष्ठ अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त व अन्य अधिकार्‍यांनी कमलापूरची आo्रमशाळा हस्तांतरीत करण्यास सहमती दर्शविली आहे.
मात्र ही शाळा अद्यापही संस्थेला तसेच गुरूदेव भक्तांना देण्यात आली नाही. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून आo्रमशाळा मिळविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती डॉ. कुंभारे यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला दलितमित्र नानाजी वाढई, भाऊराव कुमरे, पंडित पुडके, देवाजी खेवले, गणपत निंबोरकर, जयराम खोब्रागडे आदी उपस्थित होते.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: To the right, go to Guru Dutt's court