आलापल्लीत पदाधिकाऱ्यांचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:53+5:302021-08-21T04:41:53+5:30

बैठकीला कांँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, महिला काँग्रेसच्या ...

Review of office bearers in Alapally | आलापल्लीत पदाधिकाऱ्यांचा घेतला आढावा

आलापल्लीत पदाधिकाऱ्यांचा घेतला आढावा

बैठकीला कांँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, महिला काँग्रेसच्या हेमलता वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल श्रीरामवार, भीमराव आत्राम उपस्थित हाेते. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले, गॅस व इंधन दरवाढ झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वधारल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये राेष आहे. म्हणून कांँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, असे अवाहन डाॅ. उसेंडी यांनी केले. याप्रसंगी भीमराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला तालुकाध्यक्ष मुश्ताक हकीम, रज्जाक पठाण, सतीश मडावी, रूपेश बंदेला, रोहित चेर्लावार, विलास शेंडे, चंदू बोरूले, दादाजी मडावी, सुधाकर बोरूले, रामचंद्र शेंडे, विमला शेंडे, महादेव शेंडे, प्रीती गुरुनुले, वंदना श्रीरामवार, निकेश गुट्टेवार, मनोज बोरूले, वैजन कोटरंगे, मारुती ओंडगेवार, बिच्चू आत्राम, मदन भुपेलीवार उपस्थित होते.

200821\img-20210820-wa0071.jpg

आलापल्ली येथे कांग्रेस ची आढावा बैठक

Web Title: Review of office bearers in Alapally