मुख्याध्यापक धकाते यांचा सेवानिवृत्ती सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:04+5:302021-01-09T04:30:04+5:30

कुरूड : जिल्हा परिषद केंद्रशाळा कुरुड येथील मुख्याध्यापक रमाकांत जगन्नाथ धकाते हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा कुरुड येथे सेवानिवृत्ती सपत्नीक ...

Retirement felicitations of Principal Dhakate | मुख्याध्यापक धकाते यांचा सेवानिवृत्ती सत्कार

मुख्याध्यापक धकाते यांचा सेवानिवृत्ती सत्कार

कुरूड : जिल्हा परिषद केंद्रशाळा कुरुड येथील मुख्याध्यापक रमाकांत जगन्नाथ धकाते हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा कुरुड येथे सेवानिवृत्ती सपत्नीक सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख तथा प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी विजय बन्सोड होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोटगावचे केंद्रप्रमुख संजय कसबे, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक बळवंत महाजन, कन्या शाळेचे मुख्याध्यापक तेजराव धोटे, रुमदेव विनोद बडोले, बी.आर.सी.च्या होमा शहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश ठाकरे, विलास पिलारे, सदस्य जगदीश बुराडे, दिनेश ठाकरे, रणजित चौधरी, केदारनाथ बन्सोड उपस्थित होते. दरम्यान, रमाकांत धकाते व त्यांच्या सहचारिणी माया धकाते यांचा शाल व भेटवस्तू प्रदान करून सत्कार करण्यात आला. दिवाकर ढवळे यांनी सूत्रसंचालन केले, तर शिल्पा सात्तेवार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संतोष ऊके, रश्मी चांदेकर, शारदा सांगोळे व सुनील रेहपाडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Retirement felicitations of Principal Dhakate