शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

समाजऋण फेडण्यासाठी कटिबध्द

By admin | Updated: January 3, 2015 23:01 IST

ज्या समाजाने मला आपल्या कुशीत रूढी, परंपरा व संस्कारात वाढविले, केवळ मोठेच केले नाही तर राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचविले. त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी कायम कटिबध्द राहील,

आर्यवैश्य समाज मेळावा : सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
चामोर्शी : ज्या समाजाने मला आपल्या कुशीत रूढी, परंपरा व संस्कारात वाढविले, केवळ मोठेच केले नाही तर राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचविले. त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी कायम कटिबध्द राहील, अशी ग्वाही राज्याचे वित्त व नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आर्यवैश्य समाज मंडळ चामोर्शीच्यावतीने आयोजित उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते शनिवारी बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, कन्यका नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रफुल भास्करवार, नानाजी उपगन्लावार, गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, समाजाचे प्रदेश अध्यक्ष गणेश चक्करवार, मेळाव्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज पालारपवार, प्र. सो. गुंडावार, सचिव राजू कोत्तावार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, महेंद्र बुर्लावार, साधनाताई गण्यारपवार, प्रकाश शिवणीवार आदी उपस्थित होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तळोधीचे ज्येष्ठ समाज नेते अण्णासाहेब पोशेट्टीवार होते. चामोर्शी येथील साईमंदिर परिसरात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १५१ वर व ६१ वधुंची नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. संचालन संध्या विरमलवार, प्रास्ताविक मनोज पालारपवार व आभार अनिल चिलवेलवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)