शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: June 18, 2016 00:53 IST

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या,

शिक्षणमंत्र्यांना साकडे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणीगडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यासंदर्भात शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळ शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली. गडचिरोली जि. प. अंतर्गत सन २०१३-१४ मध्ये झालेल्या २२० नियमबाह्य बदल्या शासनाने यापूर्वीच रद्द केलेल्या आहेत. परंतु या नियमबाह्य बदल्यांसाठी जबाबदार असणारे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अद्यापही निलंबनाची कार्यवाही करण्यात आली नाही. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित दोषींना निलंबित करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केले. जिल्हा वार्षिक योजना २०११-१२ मध्ये जि. प. शाळेतील मुला-मुलींसाठी शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. हे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. निकृष्ट बांधकाम करून शौचालयाचा निधी हडपणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, कनिष्ठ अभियंता व गट समन्वयक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच गडचिरोली जिल्हा परिषद शाळांमधील वीज बिल अवास्तव येत असल्याने ते शाळास्तरावर भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे महावितरणने अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. जि. प. शाळांमधील सदर वीज बिलाची रक्कम अदा करण्यासाठी शासनस्तरावरून अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.निवेदन देताना शिक्षक परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, उपाध्यक्ष यशवंत शेंडे, सत्यवान मेश्राम व इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)