शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास विरोध

By admin | Updated: March 3, 2016 01:32 IST

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी समूह शाळा निर्माण करण्याचा विचार शासन करीत आहे.

५ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा : शिक्षक परिषद शासनाला पाठविणार निवेदनगडचिरोली : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी समूह शाळा निर्माण करण्याचा विचार शासन करीत आहे. यानिर्णयाचा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला आहेशासनाच्या या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ५०९ शाळा व गडचिरोली तालुक्यातील २४ शाळांवर गंडांतर येणार आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तसेच जिल्ह्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने शासनाला निवेदन पाठविणार आहेत. जिल्ह्यात प्राथमिकस्तरावर लोकसहभागातून काही शाळा डिजीटल करण्याचा शिक्षकांचा प्रयत्न सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुसज्ज केल्यास विद्यार्थी बाहेर जाणार नाहीत. जास्तीत जास्त विद्यार्थी तेथेच शिकतील. परंतु शासन त्यासाठी खर्च करायला तयार नाही. समूह शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बसची व्यवस्था केली जाईल, असे शासन सांगत आहे. मात्र हा प्रयोग यशस्वी होईल, काय याबाबत शंका आहे. गावातच शाळा असूनही विद्यार्थी येण्यास तयार होत नाही. त्याअर्थी दुसऱ्या गावी विद्यार्थी जाणार काय, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. शासनाचा हा नवीन निर्णय गरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मारक असून सदर निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे निवेदनातून केली जाणार आहे.