घोट-रेगडी मार्गाची दुरूस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:34+5:30

घोट-रेगडी हा चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गाची दुरूस्ती न झाल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने तशी मागणी नागरिकांकडून होत होती. बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

Repairs to the Ghat-Regadi route | घोट-रेगडी मार्गाची दुरूस्ती सुरू

घोट-रेगडी मार्गाची दुरूस्ती सुरू

Next
ठळक मुद्देरूंदीकरण गरजेचे : खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : घोट-रेगडी मार्ग प्रचंड प्रमाणात उखडला होता. या मार्गाची दुरूस्ती करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
घोट-रेगडी हा चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गाची दुरूस्ती न झाल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने तशी मागणी नागरिकांकडून होत होती. बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. सदर मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने केवळ खड्डे बुजवून काम चालणार नाही तर मार्गाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. सदर मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. मात्र तो अरूंद आहे. त्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास बाजू देताना अडचण होते.

Web Title: Repairs to the Ghat-Regadi route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.