शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तफावत दूर करून सुधारित वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:47 IST

कंत्राटी वाहन चालकांना नियमित वाहनचालकाच्या तुलनेत ३८ टक्केच वेतन मिळत आहेत.

कंत्राटी वाहनचालकांची मागणी गडचिरोली : कंत्राटी वाहन चालकांना नियमित वाहनचालकाच्या तुलनेत ३८ टक्केच वेतन मिळत आहेत. या तुटपुंज्या वेतनावर कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंत्राटी वाहनचालकांच्या मानधनातील तफावत दूर करून सुधारित मानधन अदा करावे, अशी मागणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांनी शासनाकडे केली आहे. २०१० मध्ये कंत्राटी वाहनचालकांची पदे भरण्यात आली. या कालावधीत कंत्राटी वाहनचालकांना एकत्रित ३ हजार ५५० याप्रमाणे मानधन अदा करण्यात आले. परंतु चंद्रपूर जि. प. अंतर्गत कंत्राटी वाहनचालकाचे मानधन १ जून २०१२ पासून ७ हजार १०० करण्यात आले. या संदर्भात गडचिरोली जि. प. आरोग्य विभागाच्या कंत्राटी वाहनचालकांनी वारंवार निवेदन सादर केल्यानंतर १ जुलै २०१४ पासून मानधनात वाढ करून ७ हजार १०० इतके करण्यात आले. आरोग्य सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेताना जर ती कामे नियमितपणे पदनिर्मिती करून केली असता, जितका खर्च आला त्या खर्चाच्या कमीत कमी १० ते २५ टक्के इतकी बचत होईल, अशा रितीने खर्च करण्यात याव्या, अशा सूचना असताना देखील २०१४ ला नियमित वाहनचालकावर होणार एकत्रित खर्च एकूण वेतनाच्या १८ हजार ५८३ इतका अपेक्षित आहे. यानुसार कंत्राटी वाहनचालकांना १३ हजार ९३७ रूपये वेतन १३ मार्च २०१४ नंतर मिळणे अपेक्षित होते. परंतु ७ हजार १०० इतकेच मानधन कर्मचाऱ्यांना मिळत आहे. हे मानधन नियमित वाहनचालकाच्या तुलनेत ३८ टक्के एवढेच आहे. या तुटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा गाडा चालविणे कठिण असल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मानसिक, आर्थिक व कौटुंबिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दखल घेऊन वेतनातील तफावत दूर करून सुधारित मानधन अदा करावे, अशी मागणी कंत्राटी वाहनचालकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)