शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९४४ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST

गडचिराेली : केंद्र व राज्य शासनाच्या प्रमुख १३ याेजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पाेर्टलवर शेतकऱ्यांनी नाेंदणी करणे आवश्यक ...

गडचिराेली : केंद्र व राज्य शासनाच्या प्रमुख १३ याेजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पाेर्टलवर शेतकऱ्यांनी नाेंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हाभरातील ९४४ शेतकऱ्यांनी पाेर्टलवर अर्ज केले आहेत. अर्ज करण्याला आता ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. प्रत्येक याेजनेसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करावा लागत हाेता. यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, श्रम वाया जात हाेता. यापासून शेतकऱ्यांची मुक्ती करण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी पाेर्टलवर नाेंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी पाेर्टलवर शेतकरी याेजना हे स्वतंत्र हेड तयार करण्यात आले आहे. अर्जाची निवड करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया या पाेर्टलद्वारेच करण्यात आली आहे. याेजनेच्या विविध टप्प्यांवर संबंधित शेतकऱ्याच्या माेबाईलवर एसएमएस पाठविल्या जाईल. यामुळे याेजनेत पारदर्शकता येण्यास मदत हाेईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

बाॅक्स

या याेजनांच्या लाभासाठी केली जात आहे नाेंदणी

प्रधानमंत्री कृषी सिंचन याेजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन याेजना, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, एकात्मिक फलाेत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड याेजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती याेजना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन याेजना, राष्ट्रीय कृषी विकास याेजनेंतर्गत मंजूर हाेणारे विविध विभागांचे प्रकल्प या याेजनांसाठी नाेंदणी हाेणार आहे.

कशी कराल नोंदणी?

इच्छुक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या पाेर्टलवर जाऊन शेतकरी याेजना हा पर्याय निवडावा. वापरकर्त्याने नाव व संकेतशब्द तयार करून आपले लाॅगीन तयार करावे. शेतकऱ्यांनी आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. वैयक्तिक माहिती, पत्ता, स्वत:च्या नावे असलेली शेती, कुटुंबाचा तपशील, शेतावरील वीज उपलब्धता यांची माहिती भरावी लागेल.

काेट

शेतकऱ्यांनी नाेंदणी करावी

एकाच नाेंदणीवर अनेक याेजनांचा लाभ दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांचा श्रम, पैसा व वेळ वाचण्यास मदत हाेणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाेंदणी करावी, यासाठी कृषी विभागाचे सर्वच कर्मचारी व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. नाेंदणीसाठी मुदतवाढ दिल्याने पुन्हा नाेंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- भाऊसाहेब बऱ्हाटे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

वेळ व श्रम वाचला

यापूर्वी प्रत्येक याेजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत हाेता. त्यासाठी शेतकऱ्यांचे अनेक दिवस वाया जात हाेते. तसेच प्रत्येक याेजनेच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवावे लागत हाेते. आता मात्र एकाच नाेंदणीवर अनेक याेजनांचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचला आहे. सर्वच याेजनांचा ऑनलाईन पध्दतीने लाभ देण्याची गरज निर्माण झाली आहे.

- चंद्रशेखर बाेबाटे

शेतकरी, फराडा