डबल फसलसाठी पाणी देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST2021-01-08T05:57:54+5:302021-01-08T05:57:54+5:30

खरिपात धानाचे उत्पादन झाले नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिकातून तरी चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा हाेती. अनेक शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे ...

Refuse to water for double crop | डबल फसलसाठी पाणी देण्यास नकार

डबल फसलसाठी पाणी देण्यास नकार

खरिपात धानाचे उत्पादन झाले नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिकातून तरी चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा हाेती. अनेक शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकले आहेत. धानाचे पऱ्हे टाकून राेवणीचे नियाेजन केले आहे. मात्र, ऐन वेळेवर पाणी न देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

बाॅक्स....

पाणी वापर नियाेजनात संस्था फेल

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पाेहाेचेल, याचे नियाेजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पाणी वापर सेवा संस्थेची आहे. मात्र, कुरूड येथील पाणी वापर सेवा संस्था पाणी वाटपाचे याेग्य नियाेजन व अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेताला वेळेवर पाणी मिळत नाही. परिणामी धानपीक करपते. त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांनी पाणसारा भरला नाही. स्वत:चे दाेष लपविण्यासाठी संस्था पाणसाऱ्याचे कारण पुढे करीत असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

काेट....

कालव्याची डागडुजी व इतर बाबींसाठी पाणसारा वसूल हाेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी मागील १० वर्षांपासून पाणसारा भरला नाही. त्यामुळे पाणसाऱ्याची थकबाकी वाढत चालली आहे. पाणसारा वसूल हाेणे आवश्यक आहे. त्यासाठी जे शेतकरी पाणसारा भरणार नाहीत, त्यांना पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी पाणसारा भरतील, त्यांना पाणी दिले जाईल.

- दादाजी नाकताेडे, अध्यक्ष, पाणी वापर संस्था, कुरूड

काेट....

कुरूड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाणसारा भरला नाही. कुरूड कालव्याअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांकडे माेठ्या प्रमाणात पाणसाऱ्याची थकबाकी आहे. थकीत पाणसारा शासन जमा केल्याशिवाय पाणीपुरवठा न करण्याचा नियम आहे. त्यानुसार संस्थेने तसा निर्णय घेतला असावा. आपल्या कार्यालयामार्फत तसा निर्णय घेतला नाही.

- मेंढे, प्रभारी मुख्य अभियंता, इटियाडाेह पाटबंधारे विभाग

Web Title: Refuse to water for double crop