शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्री विरोधात रणरागिनींचा एल्गार

By admin | Updated: August 17, 2014 23:09 IST

कायद्याने दारूबंदी असतानाही कोरची तालुक्यात अनेक गावात अवैध देशी व मोहफुलाच्या दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. या संदर्भात पोलीस व तंटामुक्त समितीकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई

कोरची : कायद्याने दारूबंदी असतानाही कोरची तालुक्यात अनेक गावात अवैध देशी व मोहफुलाच्या दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. या संदर्भात पोलीस व तंटामुक्त समितीकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या कोचीनारा येथील ६ बचतगटांच्या महिलांनी एकत्र येऊन आज रविवारी दारूविक्रेत्यांविरोधात एल्गार पुकारून तब्बल दीड लाख रूपयाची देशी दारू जप्त केली. तसेच ७ हजार रूपयाचा मोहफुलाच्या दारूचा सडवा जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केला. अवैध दारू विक्रीचा कोचीनारा येथील महिलांना प्रचंड त्रास होत होता. दरम्यान दारूविक्रीमुळे गावात भांडणतंटे होऊन सामाजिक वातावरण खराब होत होते. या संदर्भात बचतगटाच्या महिलांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर सरपंच तिलक बागडेरीया महिला बचतगटाचे अध्यक्ष भगवंतीन साहाळा यांच्या नेतृत्वात महिला एकत्र त्यांनी रघुनाथ सहारे यांच्या घरकुलामधून देशी दारूच्या ४५ पेट्या जप्त केल्या. तसेच मोहफुलाच्या दारूचा २ क्विंटल सडवाही जप्त केला. याबाबतची माहिती पोलिसांना देऊन गावात पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ट्रॅक्टर व पीकअप वाहनामध्ये भरून दारूच्या पेट्या व सडवा पोलीस ठाण्यात नेले. यावेळी सरपंच तिलक बागडेरीया, बचत गटाच्या सदस्य कामेश्वरी देवागंण, शारदा काटेंगे, महानंदा कराडे, माना सुवा, देशीरबाई सोनकुकरी, पवनभत्ती साहाळ, ललिता देवांगण, सुशिला देवांगण, प्रिती सुवा, हेमा खोबा, अमरित बागडेरिया, किरण देवांगण, समारीन सुवा, शैरा बानो पठाण, शिवबत्ती देवांगण, रमीका सोनकुकरा, पे्रमबत्ती सोनकुकरा आदीसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)