शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.

ठळक मुद्देचामोर्शीत आढावा : आमदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा; शेकडोंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.जनता दरबाराला आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश शहा, पं.स. सभापती भाऊराव डोर्लीकर, उपसभापती वंदना गौरकर, नगरसेवक विजय गेडाम, तहसीलदार संजय गंगथडे, प्रभारी बीडीओ नितेश माने, नायब तहसीलदार एस. के. तनगुलवार, अविनाश पिसाड, दिलीप दुधबळे, एम. एन. शेंडे, पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर, उपविभागीय अभियंता एस. एम. उरकुडे, पी. यू. ठाकरे, चिचडोह बॅरेजचे अभियंता आर. एल. चापले, शिक्षण विस्तार अधिकारी एम. बी. कडते, विकास दुधबावरे, नितीन हेडाऊ, वाय. एस. मेश्राम, के. सी. शेडमाके, विस्तार अधिकारी एम. के. काळबांधे, कृषी पर्यवेक्षक अभिलाषी येरमे, एम. जी. गोवर्धन, जे. डी. झिलपे, साईनाथ बुरांडे, प्रतिक राणे, जयराम चलाख, विनोद गौरकर आदी उपस्थित होते.सामान्य नागरिकांची प्रशासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबाराला ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. ज्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या तक्रारी संबंधित विभागाकडे सात दिवसांच्या आत पाठवून १५ दिवसांमध्ये त्याचे निराकरण करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.प्रास्ताविक तहसीलदार संजय गंगथडे, संचालन रमेश अधिकारी यांनी मानले.चौथ्या गुरूवारी भरणार जनता दरबारनागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या चौथ्या गुरूवारी जनता दरबार घेतले जाईल. फेब्रुवारी महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहून तक्रारी मांडाव्या, असे आवाहन अधिकारी व आमदारांनी केले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळीMLAआमदार