शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत तंबाखूच्या १० दुकानांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पानठेले बंद करण्याचे तसेच किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. परंतु या आदेशाची पायमल्ली करत छुप्या मार्गाने अहेरी तालुक्यात विक्री सुरूच आहे. पानठेले बंद असल्याने जास्त पैसा मिळविण्यासाठी किराणा दुकानदार तंबाखूजन्य पदार्थाची अवैध साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करीत आहे.

ठळक मुद्दे६८ हजारांचा मुद्देमाल जप्त : दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : किराणा दुकानातून होत असलेली तंबाखूजन्य साहित्याची विक्री रोखण्यासाठी शनिवारी अहेरी व आलापल्ली येथे एकूण दहा दुकानांवर नगरपंचायत, पोलीस प्रशासन व मुक्तिपथने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला.विशेष म्हणजे, अहेरी, आलापल्ली शहरासह तालुक्यात ‘संचारबंदीतही खर्राविक्री जोमात’ या मथळ्याखाली लोकमतने १६ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासन व मुक्तिपथच्या वतीने सदर धाड सत्र राबविण्यात आले.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पानठेले बंद करण्याचे तसेच किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. परंतु या आदेशाची पायमल्ली करत छुप्या मार्गाने अहेरी तालुक्यात विक्री सुरूच आहे. पानठेले बंद असल्याने जास्त पैसा मिळविण्यासाठी किराणा दुकानदार तंबाखूजन्य पदार्थाची अवैध साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करीत आहे. तालुक्यातील आलापल्ली हे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारे गाव असून येथील बाजारपेठही मोठी आहे. तंबाखूजन्य पदार्थाचा पुरवठा या गावातून सर्वत्र होतो. त्यामुळे हा प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समिती, मुक्तिपथ, पोलीस प्रशासन आणि येथील सरपंच सुगंधा मडावी यांनी आठ दुकानांत धाड टाकून तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करून विक्रेत्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकाराला. त्यानंतर कारवाईचा मोर्चा अहेरी शहरात वळविण्यात आला येथील तपासणीत दोन दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडले. नगर पंचायतची चमूही या कारवाईत सहभागी झाली होती. नगर पंचायतने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड विक्रेत्यांकडून वसूल केला. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीचे जिल्हा समन्वयक डॉ. नंदू मेश्राम, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, न. पं. मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, रूपाळी काळे, पोलीस कर्मचारी, मुक्तिपथचे केशव चव्हाण, मारुती कोलावार यांनीे कारवाई केली. 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी