शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: March 20, 2015 01:21 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात पूर्व विदर्भातील मामा तलावांच्या दुरूस्ती व नुतनिकरणासाठी १०० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

गडचिरोली : राज्याच्या अर्थसंकल्पात पूर्व विदर्भातील मामा तलावांच्या दुरूस्ती व नुतनिकरणासाठी १०० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६४५ मामा तलाव आहेत. या तलावांच्या दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाला सिंचनाची मोठ्या प्रमाणात गरज भासते. मामा तलावांच्या माध्यमातून ही गरज पूर्ण केल्या जाते. संपूर्ण मामा तलाव हे ५० वर्षांपूर्वीचे आहेत. काळाच्या ओघात अनेक तलावांच्या पाळी, तुरूम फुटले आहेत. परिणामी पाणी साचून राहत नाही. तलावात गाळ गोळा झाल्याने तलावाची पाणी साठविण्याची क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून धानपीक अडचणीत येण्यास सुरुवात झाली होती. राज्याचे अर्थमंत्री पूर्व विदर्भातील असल्याने त्यांना या गंभीर समस्येची जाणीव होती. बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी सुमारे १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६४५ मामा तलाव आहेत. यातील बहुतांश तलावांची दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे. अशातच या तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)