शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात हमीभावापेक्षाही कमी दराने धानाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे साधारण धानाला १ हजार ९४० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. त्यापेक्षा कमी दराने धान खरेदी करण्यात आल्यास संबंधितांवर एक वर्षे कैद व ५० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. या कायद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, याबाबतचे शासन परिपत्रक अद्यापही संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांना प्राप्तच झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पुरुषाेत्तम भागडकरलाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाला हरताळ फासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्यल्प दराने धान खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान विक्रीकडे पाठ फिरविली आहे. हमीभावापेक्षा कमी दराने धानाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे साधारण धानाला १ हजार ९४० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. त्यापेक्षा कमी दराने धान खरेदी करण्यात आल्यास संबंधितांवर एक वर्षे कैद व ५० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. या कायद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, याबाबतचे शासन परिपत्रक अद्यापही संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांना प्राप्तच झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक करण्यात येत आहे. कमी भावाने धान खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विकण्याकडे पाठ फिरविली आहे.शासकीय धान खरेदी केंद्राव्यतिरिक्त इतर कुठेही हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान साठवणुकीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना बरेचदा गोडावून फुल्लचा जबर फटका बसते. वेळेत धान विक्री होत नसल्याने मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना धान विकून आपली गरज भागवावी लागत आहे. 

खरेदी केंद्र सुरू करा-   हलक्या धानाची मळणी पूर्ण झाली आहे. मध्यम कालावधीच्या धानाची कापणी सुरू आहे. कर्ज काढून शेतकरी धानाची लागवड करते. हे कर्ज फेडण्यासाठी धानाची मळणी हाेताच विक्री करण्याची तयारी शेतकरी करते. शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन व्यापारी अत्यंत कमी किमतीत धानाची खरेदी करतात. त्यावर आळा घालण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड