जिल्ह्यात ठिकठिकाणी पल्स पाेलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:32+5:302021-02-05T08:50:32+5:30

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा येथे ० ते ५ वर्ष वयाेगटातील बालकांना पाेलिओ डाेस देण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, ...

Pulse paleo vaccination at various places in the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी पल्स पाेलिओ लसीकरण

जिल्ह्यात ठिकठिकाणी पल्स पाेलिओ लसीकरण

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा येथे ० ते ५ वर्ष वयाेगटातील बालकांना पाेलिओ डाेस देण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, आराेग्य कर्मचारी व पालक उपस्थित हाेते.

सिराेंचा : प्राथमिक आराेग्य उपकेंद्र, आरडा येथे पल्स पाेलिओ माेहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी केंद्र, तुमनूर माल येथे आराेग्य सेविका माधवी उईके, आशा वर्कर रंजिता बटू यांच्या हस्ते बालकांना डाेज देण्यात आला.

रांगी : येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पल्स पाेलिओ लसीकरण माेहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनाेहर पाेरेटी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. याेगेश सयाम, डाॅ. भूषण ताराम, पर्यवेक्षक दादाजी डाेंगरे, पत्रकार देवराव कुनघाडकर तसेच आराेग्य कर्मचारी उपस्थित हाेते. गावातील अनेक बालकांना पाेलिओचा डाेस देण्यात आला.

देसाईगंज : येथील ग्रामीण रूग्णालयात ५ वर्षांखालील बालकांना पाेलिओचा डाेस देण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष माेतिलाल कुकरेजा, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष इलियास खान, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन मिसार, डाॅ. सुनील ठक्कर, डाॅ. अश्फाक इकबाल, डाॅ. प्रणय काेसे, मेरी विल्सन उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

भामरागड : तालुका मुख्यालयासह दुर्गम भागात पल्स पाेलिओ लसीकरण माेहीम राबविण्यात आली. ० ते ५ वर्षाखालील बालकांना अंगणवाडी सेविका, आशावर्कर व आराेग्य कर्मचाऱ्यांनी पाेलिओचा डाेस दिला. यावेळी पालक उपस्थित हाेते.

Web Title: Pulse paleo vaccination at various places in the district