प्राणपूर रिठ जागेच्या मोजणीचा जीपीएस नकाशा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST2021-02-11T04:38:29+5:302021-02-11T04:38:29+5:30

प्राणपूर रिठ क्रमांक ५४६, ५४७, ४७३ जागेची मोजणी वनविभागाने २० ते ३१ ऑक्टाेबर २०२० ला या कालावधीत केली. ...

Provide GPS map of Pranpur Rith area measurement | प्राणपूर रिठ जागेच्या मोजणीचा जीपीएस नकाशा द्या

प्राणपूर रिठ जागेच्या मोजणीचा जीपीएस नकाशा द्या

प्राणपूर रिठ क्रमांक ५४६, ५४७, ४७३ जागेची मोजणी वनविभागाने २० ते ३१ ऑक्टाेबर २०२० ला या कालावधीत केली. मात्र तीन महिने उलटूनही अजूनपर्यंत जीपीएस नकाशा मिळाला नाही. वन विभागाचा निष्काळजीपणा व अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे काम रखडले आहे. वन विभागाच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली तर उद्या किंवा परवा काम हाेईल, असे सांगितले जाते. देसाईगंज येथील कार्यालयात ये-जा करताना नागरिकांना प्रवासाचा खर्च साेसावा लागताे. त्यामुळे १२ फेब्रुवारीपर्यंत जीपीएस नकाशा द्यावा; अन्यथा १५ फेब्रुवारीला चक्का जाम आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी वडसाच्या उपवनसंरक्षकांना निवेदनाद्वारे दिला. निवेदन देताना जि. प. सदस्य अनिल केरामी, मुकेश नरोटे, गणेश वरखडे, रामसाय केरामी, जगदीश बोगा, श्रीराम मडावी, दामेसाय केरामी आदी उपस्थित हाेते.

Web Title: Provide GPS map of Pranpur Rith area measurement