गडचिरोलीत स्ट्रॉबेरीच्या शेतीला चालना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:39 AM2021-05-11T04:39:13+5:302021-05-11T04:39:13+5:30

गडचिरोलीला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी, यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन करावे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेचे बळ देतानाच ती ...

Promote strawberry cultivation in Gadchiroli | गडचिरोलीत स्ट्रॉबेरीच्या शेतीला चालना द्या

गडचिरोलीत स्ट्रॉबेरीच्या शेतीला चालना द्या

Next

गडचिरोलीला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी, यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन करावे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेचे बळ देतानाच ती कमी खर्चाची आणि उत्पादन वाढविणारी असावी, यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजार संशोधन करावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

कोरची तालुक्यात जांभळाचे वन आहे. येथील जांभळांना संपूर्ण राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असून, संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जांभळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रक्रिया उद्योगदेखील सुरू करावा, अशी अपेक्षा ना. शिंदे यांनी व्यक्त केली.

(बॉक्स)

दक्षिणेकडील तालुक्यांना तेलंगणातून खत पुरवठा व्हावा

गडचिरोली जिल्ह्याला खतांचे वितरण चंद्रपूर येथून केले जाते. सिरोंचा तालुका हा सुमारे ३५० किमी अंतरावर आहे. अशावेळी या तालुक्याला खतांचा पुरवठा लगतच्या तेलंगणा येथून करण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून वेळेची बचत होतानाच वाहतूक खर्चही कमी होईल, असे पालकमंत्र्यांनी सूचविले.

(बॉक्स)

मोहफुलांचा वापर पोषक आहारासाठी करावा

गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांची मोठी आर्थिक उलाढाल होते. सुमारे ३ लाख मजूर मोहफूल गोळा करण्याचे काम करतात. त्याद्वारे १४०० कोटी रुपयांची उलाढाल होते. अशा या मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करताना त्यातील औषधी आणि पोषण मूल्ये यासंदर्भात झालेले संशोधन लक्षात घेऊन या फुलांचा वापर पोषक आहारासाठी करण्यासाठी प्रयत्न करावेत. याठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.

(बॉक्स)

धान साठवणुकीसाठी गोदामांची संख्या वाढवावी

जिल्ह्यात धान साठविण्यासाठी गोदामांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. हा विषय कृषी संलग्न असल्याने गडचिरोली जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढविण्यात यावी, जेणेकरून धानाची साठवण क्षमतादेखील वाढविता येणे शक्य होईल. गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाची २७९ पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्याची मागणीही पालकमंत्री शिंदे यांनी कृषिमंत्री भुसे यांच्याकडे केली.

Web Title: Promote strawberry cultivation in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.