२४ तासात वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:01+5:30

वादळामुळे वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी वीज तारा तुटल्याने भामरागड शहराचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन ते चार तास तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे काम वीज कर्मचाºयांनी केले.

Power supply in 24 hours | २४ तासात वीज पुरवठा सुरळीत

२४ तासात वीज पुरवठा सुरळीत

googlenewsNext
ठळक मुद्देझाडे पडून वीज तारा तुटल्या : भामरागड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने वीज तारा तुटल्या. परिणामी शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने प्रयत्न करून २४ तासात भामरागड शहराचा वीज पुरवठा सुरळीत केला.
वादळामुळे वीज तारांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. परिणामी वीज तारा तुटल्याने भामरागड शहराचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन ते चार तास तुटलेल्या वीज तारा जोडण्याचे काम वीज कर्मचाºयांनी केले. भामरागड येथील विश्वेश्वरराव चौक व मुस्लिम टोला भागात वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र अंधार पडल्याने इतर भागातील वीज दुरूस्तीचे काम बंद करावे लागले.
पोलीस स्टेशन चौक, आंबेडकरनगर, वीर बाबुराव चौक व शोभानगर आदी भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित होता. सोमवारी पोलीस व वीज कर्मचाºयांच्या परिश्रमाने या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आले. पोलीस स्टेशनसमोरील मोठे झाडे वीज तारांवर पडल्याने वीज खंडित झाली. सोमवारी सकाळपासूनच दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. रखरखत्या उन्हात गरम वीज खांबावर चढण्यासाठी वीज कर्मचाºयांना कसरत करावी लागली. भामरागड येथील अभियंत्याकडे अल्प मनुष्यबळ आहे. त्यामुळे दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ लागतो. रविवारी सायंकाळी अर्धा तास झालेल्या जोरदार वादळी पावसाने भामरागडवासीयांना हादरवून सोडले. वादळामुळे नागरिकांमध्ये तारांबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक संदीप भांड, हवालदार खोब्रागडे यांच्यासह लाईनमन नदीम शेख, राजू महका, शशिकांत ढोले यांनी सहकार्य केले.
 

Web Title: Power supply in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज