१० तासानंतर वीज सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:01:30+5:30

कोटगल येथे असलेल्या २२० केव्ही सब स्टेशनवरून गडचिरोली व धानोरा तालुक्यातील गावांना वीज पुरवठा केला जाते. यासाठी सेमाना, गडचिरोली, कोटगल, अमिर्झा, सावेला येथे ३३ केव्ही सबटेशन आहेत. गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली व धानोरा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणचे इन्सुलेटर तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.

Power on after 10 hours | १० तासानंतर वीज सुरळीत

१० तासानंतर वीज सुरळीत

ठळक मुद्देगडचिरोली शहर रात्रभर अंधारात : वीज कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गुरूवारी रात्री वादळ, पाऊस व मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट यामुळे गडचिरोली व धानोरा तालुक्यातील वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. वीज कर्मचाऱ्यांनी रात्रभर केलेल्या परिश्रमानंतर १० तासांच्या कालावधीनंतर गडचिरोली व धानोरा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत झाला.
कोटगल येथे असलेल्या २२० केव्ही सब स्टेशनवरून गडचिरोली व धानोरा तालुक्यातील गावांना वीज पुरवठा केला जाते. यासाठी सेमाना, गडचिरोली, कोटगल, अमिर्झा, सावेला येथे ३३ केव्ही सबटेशन आहेत. गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली व धानोरा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणचे इन्सुलेटर तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.
गडचिरोली शहराचा वीज पुवठा रात्री ८.२३ वाजता खंडीत झाला. संपूर्ण शहर अंधाराच्या सावटात सापडले होते. वीज कर्मचाºयांनी कोटगल लाईनवरील बिघाड दुरूस्त केल्याने कोटगल व कॉम्प्लेक्स परिसरातील वीज पुरवठा रात्री ११ वाजता सुरू झाला. त्यानंतर सेमाना परिसरातील विद्युत लाईनवरील बिघाड दुरूस्त केल्यानंतर शहरातील काही भागाचा वीज पुरवठा रात्री १ वाजता सुरू झाला. काही वार्डांमध्ये मात्र वीज पुरवठा सुरू होण्यास शुक्रवारी सकाळचे ६ वाजले. इंदिरानगर व लांझेडा येथील वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी १ वाजता सुरू झाला. रात्रभर वीज नसल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. अमिर्झा, सावेला, धानोरा तालुक्यातील गट्टा, पेंढरी, मुरूमगाव, धानोरा येथे गडचिरोली येथूनच वीज पुरवठा केला जाते. वादळामुळे झाडे कोसळल्याने या भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला. याही भागाचा वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सुरू झाला.

गुरूवारी रात्रभर सुरू होती शोधमोहीम
मोठ्या प्रमाणात विजा कोसळल्याने अनेक खांबावरील इन्सुलेटर फुटले. त्यामुळे रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली व धानोरा तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर वीज कर्मचाºयांनी रात्रभर शोधमोहीम राबवून बिघाड दुरूस्त केला.

Web Title: Power on after 10 hours

टॅग्स :electricityवीज