शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

डाक खात्याचा गलथान कारभार

By admin | Updated: July 24, 2015 01:28 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १ ते २ महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आलेले हजारो आरसी बूक व परवाना वाहनधारकांना डाक विभागातून प्राप्त न झाल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

वाहनधारक त्रस्त : वाहन नोंदणी पुस्तक व परवाने झाले गायब
गडचिरोली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १ ते २ महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आलेले हजारो आरसी बूक व परवाना वाहनधारकांना डाक विभागातून प्राप्त न झाल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. डाक विभागात याबाबत काहीही माहिती वाहनधारकांना दिली जात नाही, अशी तक्रार वाहनधारकांनी केली आहे.
गडचिरोली येथे कॉम्प्लेक्स परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. या कार्यालयातून नागरिकांनी नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन केले होते. तसेच काही नागरिकांनी वाहन परवान्यासाठी अर्जही केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या नागरिकांना पोस्टामार्फत संबंधित नोंदणी बूक व परवाने पाठविले. गडचिरोली डाक कार्यालयात सदर कागदपत्र पाठविण्यात आले. परिवहन विभाग शासनाने ठरविल्याप्रमाणे ५० रूपये फी आकारून हे कागदपत्र देतात व पोस्टाद्वारे ते पाठवितात. त्यानंतर वितरणाची जबाबदारी डाक विभागाची आहे. मात्र गडचिरोली डाक विभागात संबंधित कागदपत्र आलमारीमध्ये पडून असल्याची माहिती काही वाहनधारकांना मिळाली होती. त्यांनी डाक कार्यालयात जाऊन याची चौकशी केली. मात्र तेथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता वाहनधारक अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही आधारकार्ड पोस्ट कार्यालयात पडून होते. नागरिक स्वत: येऊन ते घेऊन जात होते. या पार्श्वभूमीवर आता डाक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर कागदपत्र वितरण करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने डाक कार्यालयात चौकशी केली असता, एकही जबाबदार अधिकारी येथे हजर मिळाला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)