हनुमाननगर-घोट काॅर्नर मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:24 AM2021-06-21T04:24:14+5:302021-06-21T04:24:14+5:30

चामोर्शीतील मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून हनुमाननगरकडे जाणारा बायपास रस्ता राईस मिलपासून घोट काॅर्नरपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून गिट्टी व ...

Poor condition of Hanuman Nagar-Ghot Corner Road | हनुमाननगर-घोट काॅर्नर मार्गाची दुरवस्था

हनुमाननगर-घोट काॅर्नर मार्गाची दुरवस्था

Next

चामोर्शीतील मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून हनुमाननगरकडे जाणारा बायपास रस्ता राईस मिलपासून घोट काॅर्नरपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून गिट्टी व मुरूम बाहेर पडले आहे. सदर मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहनधारक, शेतीकडे जाणारे नागरिक तसेच पायदळ जाणाऱ्यांना त्रास हाेत आहे. शिवाय या मार्गावर मोठ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. याच बायपास मार्गावर राईस मिल, पोस्ट ऑफिस, आश्रमशाळा, नर्सिंग कॉलेज, भूमिअभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी (राजस्व) कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, सेतू केेंद्र, दुकाने आहेत. त्यामुळे अनेक नागरिक कामानिमित्त दुचाकी, चारचाकी व पायदळ येत असतात. यासाठी सदर मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

===Photopath===

200621\img_20210620_110432.jpg

===Caption===

चामोर्शी तील हनुमान नगर ते घोटी कॉर्नर जाणाऱ्या रस्त्याची झाली वाट खडतर फोटो

Web Title: Poor condition of Hanuman Nagar-Ghot Corner Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.