शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतात लपवून ठेवलेला १.९९ लाखांचा गूळ व मोहसडवा चामोर्शी पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST

चामोर्शी : तालुक्याच्या नवग्राम शेतशिवार व जंगल परिसरात पाेलिसांनी छापा मारून लपवून ठेवलेला गूळ व माेहाचा सडवा, तसेच साहित्य ...

चामोर्शी : तालुक्याच्या नवग्राम शेतशिवार व जंगल परिसरात पाेलिसांनी छापा मारून लपवून ठेवलेला गूळ व माेहाचा सडवा, तसेच साहित्य मिळून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १६ सप्टेंबर राेजी गुरुवारी केली.

नवग्राम गावालगतच्या जंगल परिसरात हातभट्टीची दारू गाळण्यासाठी ठिकठिकाणी गूळ व माेहाचा सडवा टाकून ठेवला असल्याची गाेपनीय माहिती चामाेर्शी पाेलिसांना मिळाली. या माहितीवरून चामाेर्शी पाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बिपीन शेवाळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शेतशिवार व जंगल परिसर गाठले.

दाेन पंचासह पाहणी केली असता, एका खड्ड्यात २०० लीटर क्षमतेच्या पाच नग प्लास्टिक ड्रममध्ये ८०० लीटर इतका माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह ८४ हजार रुपये आहे. लगतच झुडपी जंगलात २०० लीटर क्षमतेच्या पाच ड्रममध्ये एक हजार लिटर माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह एक लाख पाच हजार रुपये आहे, तसेच महिला विक्रेती लता संजय मिश्रा हिच्या घरी १० हजार रुपये किमतीची ५० लिटर गूळ व माेहाची दारू सापडली. हा सर्व मिळून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला.

ही कारवाई प्रभारी अधिकारी बिपीन शेवाडे यांच्या नेतृत्वात पाेलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, पाेलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, ज्ञानेश्वर लाकडे, देवेंद्र मजोके, एस.पी.ओ. चंपत मडावी, तसेच पाेलीस कर्मचाऱ्यांनी केली.

(बॉक्स)

घटनास्थळीच नष्ट केला सडवा

रासायनिक परीक्षणासाठी थाेडासा माल वेगळा काढून ठेवण्यात आला. उर्वरित सर्व मुद्देमाल पाेलिसांनी घटनास्थळी प्लास्टिक ड्रमसह नष्ट केला. याप्रकरणी आराेपी सराेनीत हरसिद सिकदार, महेश मनाेरंजन मंडल व लता संजय मिश्रा, सर्व रा. नवग्राम यांच्यावर चामाेर्शी पाेलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फाैजदार रमेश काेडापे व पाेलीस हवालदार याेगेश्वर वाकुडकर करीत आहेत.

बाॅक्स...

सणाच्या कालावधीत दारू विक्रीला ऊत

पाेळा, गणेशाेत्सव या सणासुदीच्या कालावधीत चामाेर्शी तालुक्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात देशी, विदेशी, माेहफूल दारूची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. पाेलिसांकडून कारवाई हाेत असली तरी रात्रीच्या सुमारास आडमार्गाने जिल्ह्याबाहेरून दारू येत असल्याचे चित्र आहे. दारू विक्रीला पूर्णत: राेख लावण्यासाठी चामाेर्शी शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय दारूची आयात-निर्यात थांबणार नाही.

170921\img-20210917-wa0140.jpg

दारु फोटो