शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेपनपल्लीतही सुरू झाली पोलिसांची ‘दादालोरा खिडकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

पात्र असूनही अनेक जण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. हे होऊ नये म्हणून पोलिसांच्या पुढाकाराने आता ठिकठिकाणी ‘दादारोला खिडकी’ (पोलीस दादाची खिडकी) सुरू केली जात आहे. रेपनपल्ली उपपोलीस ठाण्यातही या खिडकीचे उद्घाटन १ जूनला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

ठळक मुद्देनागरिकांची विविध कामे एकाच ठिकाणी होणार

लाेकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर/भामरागड : दुर्गम भागातील नागरिकांना विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवणे परवडत नाही. अनेक जण त्या भानगडीतच पडत नाही. परिणामी पात्र असूनही अनेक जण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. हे होऊ नये म्हणून पोलिसांच्या पुढाकाराने आता ठिकठिकाणी ‘दादारोला खिडकी’ (पोलीस दादाची खिडकी) सुरू केली जात आहे. रेपनपल्ली उपपोलीस ठाण्यातही या खिडकीचे उद्घाटन १ जूनला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी सीआरपीएफच्या बटालियन ९चे असिस्टंट कमांडन्ट गौतम सरकार, प्रभारी अधिकारी विश्वास शिंगाडे, पो. उपनिरीक्षक पांडुरंग हाके, उपनिरीक्षक विनोद अबूज, पोलीस कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते. 
सदर खिडकीचे उद्घाटन मर्रीगुडम गावचे पोलीसपाटील नाना आलाम यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित नागरिकांना एसडीपीओ राहुल गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन केले.

धोडराजमध्ये बियाणांसाठी नोंदणी
पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत भामरागड तालुक्यातील धोडराज येथे शेतकऱ्यांची बियाणे अनुदानासाठी मोफत नोंदणी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर भात, मुग, उडीद असे बियाणे अनुदानावर  मिळण्यासाठी धोडराज हद्दीतील शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. 

बहुतांश भागात नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशनसाठी भामरागड येथे जावे लागत असे. सेवा केंद्रावर  रजिस्ट्रेशनसाठी १५० रुपये घेत असत. परंतु दादारोला खिडकीत रजिस्ट्रेशन मोफत करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

हे शिबिर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी मनीष कलवानिया, सोमय मुंडे, समीर शेख, एसडीपीओ डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. प्रभारी अधिकारी राजेश घाडगे, पीएसआय गुरव, पाटील,  नायक प्रीती खोब्रागडे, घोष यांनी मदत केली.

विविध प्रमाणपत्रांचे वाटप

पोलीस दादाच्या खिडकीतून योजनांचा लाभ देण्यासाठी मदत केली जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये रेपनपल्ली उपपोलीस स्टेशनच्या हद्दीमधील २० नागरिकांना जात प्रमाणपत्र, ७० नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, ६ नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्राचे  वाटप  करण्यात आले.
 

 

टॅग्स :Policeपोलिस