तिर्थस्थळ मार्कंडाचा प्रवास झाला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:32+5:302021-01-13T05:35:32+5:30

मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागातून हजाराे भाविक येतात. दाेन महिन्यानंतर ११ मार्चपासून महाशिवरात्रीनिमित्त येथे माेठी जत्रा भरणार ...

The pilgrimage to Markanda was a difficult one | तिर्थस्थळ मार्कंडाचा प्रवास झाला खडतर

तिर्थस्थळ मार्कंडाचा प्रवास झाला खडतर

मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागातून हजाराे भाविक येतात. दाेन महिन्यानंतर ११ मार्चपासून महाशिवरात्रीनिमित्त येथे माेठी जत्रा भरणार आहे. मात्र रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने वाहनधारक भाविकांना मार्कंडा तिर्थस्थळी पाेहाेचणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी दखल घेऊन या रस्त्याची नवाने बांधणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चामाेर्शी-मार्कंडा, चामाेर्शी व्हाया शंकरपूर हेटी तसेच फराडा व मार्कंडा या मार्गाने मार्कंडा तिर्थस्थळी नागरिक व भाविक दरराेज येत असतात. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यापासून चिचडाेह बॅरेजच्या कामासाठी जड वाहने मार्कंडा मार्गावरून आवागमन करीत हाेते. त्यामुळे या रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले असून गिट्टी उखडली आहे. सदर मार्गाची पक्क्या स्वरूपात दुरूस्ती करावी, अशी मागणी देवस्थान ट्रस्ट व भाविकांकडून सातत्याने हाेत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. केंद्रीय सहाय्य याेजनेंतर्गत चामाेर्शी-मार्कंडा या रस्त्याचे सिमेंट काॅंक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

===Photopath===

110121\11gad_1_11012021_30.jpg

===Caption===

डांबर उखडून चामाेर्शी- मार्कंडा रस्त्याची झालेली दुरवस्था.

Web Title: The pilgrimage to Markanda was a difficult one