शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडविरोधात पाथरगोटावासीयांचा एल्गार

By admin | Updated: January 24, 2016 01:11 IST

येथून जवळच असलेल्या पाथरगोटा गावालगतच्या भगवानपूर बिटामध्ये वन विकास महामंडळाच्या वतीने झाडांची तोड करण्यात येत आहे.

घटनास्थळी केले आंदोलन : दोन हजार झाडांची झाली कत्तलजोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पाथरगोटा गावालगतच्या भगवानपूर बिटामध्ये वन विकास महामंडळाच्या वतीने झाडांची तोड करण्यात येत आहे. नवीन रोपवन लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगण्यात येत असले तरी झाडे नष्ट झाल्याने गावकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ५०० च्या वर नागरिकांनी बिटात जाऊन झाडांची तोड बंद करण्याचे आवाहन केले. पाथरगोटालगतच्या भगवानपूर येथील वळणावर गरीब नागरिकांची उपजीविका पारंपरिक पध्दतीने चालत आहे. भगवानपूर बिटातील कक्ष क्रमांक ८३ मध्ये १ हजार २५ हेक्टर आरमध्ये मोठ्या झाडांची जंगल आहे. यात मोह, चारोळी, बेहडा वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. गरीब नागरिक मोहफूल, चारोळी, बेहडा गोळा करून आपली उपजीविका करीत आहेत. या माध्यमातून नागरिकांना वर्षभर रोजगार मिळत आहे. यातच सदर बिट वन विकास महामंडळाला सुपूर्द झाल्याने नवीन रोपवन लावण्याच्या नावाखाली नैसर्गिक व जुन्या झाडांची कत्तल केली जात आहे. सद्यस्थितीत चार ते पाच हेक्टरवरील दोन हजारपेक्षा अधिक झाडे कापण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून बिट कटाई बंद केली. यावेळी उपसरपंच शरद दोनाडकर, रूपचंद दोनाडकर, नारायण पिलारे, उत्तम मेश्राम, शारदा लोखंडे यांच्यासह जवळपास ५०० नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)भगवानपूर बिटात वन विकास महामंडळाच्या वतीने बिट कटाई सुरू आहे. वरिष्ठांच्या परवानगीनंतरच बिट कटाईचे काम हाती घेण्यात आले आहे व शासकीय आदेशानुसारच हे काम करण्यात येत आहे. झाडे तोडलेल्या ठिकाणी नवीन झाडांची लागवड केली जाणार आहे. - यु. के. खडगी, वनरक्षक भगवानपूर