शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी बदलले समस्या मात्र जैसे थेच

By admin | Updated: March 19, 2015 01:24 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात विविध समस्या असून या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात विविध समस्या असून या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी, सरकार बदलले मात्र समस्या सुटण्याच्या दृष्टीने काहीही हालचाली दिसत नसल्याने सर्वसामान्य नागरिक निराश झाले आहेत. कमलापूर येथे एक खासगी हायस्कूल व एक प्राथमिक शाळा आहे. बऱ्याच वर्षांपासून या शाळा सुरू आहेत. मात्र संस्थांनी इमारत बांधली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे अडचणीत शिक्षण घ्यावे लागत आहे. कमलापूरला मानव विकास मिशनची बस येते. मात्र जिल्हास्तरापर्यंत जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुका आल्या. मतदारांना आश्वासने मिळाली. मात्र त्यानंतर कुठेही विकासाचे चित्र दिसून आले नाही. गेल्यावेळी दीपक आत्राम आमदार होते. जिल्हा परिषद मतदार संघात राणी रूख्मीनीदेवी निवडून आल्या. सध्या लोकसभेत अशोक नेते व विधानसभेत अम्ब्रीशराव आत्राम निवडून आलेत. मात्र विकासाचे कुठलेही चित्र बदलले नाही. परिस्थिती जशी आहे तशीच कायम आहे. लोकप्रतिनिधी नवे असले तरी या भागाकडे त्यांनी निवडणुकीनंतर दौराही केला नाही. (वार्ताहर)