शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ऋणानुबंध असल्याशिवाय माणसं एकत्र येत नाही

By admin | Updated: October 19, 2016 02:19 IST

ऋणानुबंध असल्याशिवाय माणसं एकत्र येत नाही. तसेच चांगल्या माणसाच्या आठवणीशिवाय माणसाच्या डोळ्यात अश्रू येत नाही.

सुभाष जोशी यांचे प्रतिपादन : आरमोरीत ‘आठवण’ स्मरणीकेचे विमोेचनआरमोरी : ऋणानुबंध असल्याशिवाय माणसं एकत्र येत नाही. तसेच चांगल्या माणसाच्या आठवणीशिवाय माणसाच्या डोळ्यात अश्रू येत नाही. माजी आ. स्व. नामदेवराव पोरेड्डीवार हे समाजकारण करताना नेहमी समाजाच्या उन्नतीसाठी झटत होते, असे प्रतिपादन दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड मुंबईचे कार्याध्यक्ष तथा कराड अर्बन कोआॅपरेटीव्ह बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाष जोशी यांनी केले. समाजकार्य व विकास संस्था आरमोरीच्या वतीने संपादीत ‘आठवण’ या स्मरणीकेचा विमोचन सोहळा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आरमोरीच्या सभागृहात सोमवारी पार पडला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोेरेड्डीवार, शिक्षण संस्थाध्यक्ष सुधीर भातकुलकर, सैफुभाई जीवाणी, भाग्यवान खोब्रागडे, अरूण शेबे, उत्तम गेडाम, मदन मेश्राम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, बँकेचे मानद सचिव अनंत साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सुभाष जोशी म्हणाले, जुन्या पिढीने दिलेल्या संस्कारामुळे आज त्यांचा वारसा नवीन पिढी अविरत सुरू ठेवून कार्य करीत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम पोरेड्डीवार कुटुंब करीत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यात उत्तम सेवा देत आहे, असे ते म्हणाले. अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, संस्कृतीचे जतन केल्याशिवाय येणारी नवी पिढी सुसंस्कृत होऊ शकत नाही. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई यांनी प्रकाशित केलेले महापुरूषांचे विचार विद्यार्थ्यांना कळावे म्हणून समाजकार्य व विकास संस्थेद्वारा १ हजार पुस्तके शाळांना पुरविण्यात आले आहे. आपली संस्कृती नव्या पिढीने रूजवायची असेल तर कर्तृत्ववान महापुरूषांचे विचार अंगिकारणे आवश्यक आहे. याप्रसंगी आ. क्रिष्णा गजबे यांनी पोरेड्डीवार परिवारांच्या पाठिंब्यामुळे व सहवासामुळे आपण या स्थानावर पोहोचले असे मत व्यक्त केले. यावेळी सुधीर भातकुलकर, उत्तम गेडाम यांनीही नामदेवराव पोरेड्डीवार यांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार श्रीहरी कोपुलवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)