शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांसमोर मांडल्या जनतेने व्यथा

By admin | Updated: July 17, 2015 01:37 IST

सिरोंचा येथील नगर पंचायतीच्या भवनात खा. अशोक नेते यांचा जनता दरबार मंगळवारी पार पडला.

सिरोंचात जनता दरबार : १५० वर तक्रारींपैकी ८० तक्रारींचा झाला निपटारा
सिरोंचा : सिरोंचा येथील नगर पंचायतीच्या भवनात खा. अशोक नेते यांचा जनता दरबार मंगळवारी पार पडला. या जनता दरबारात परिसरातील नागरिकांनी आपल्या अनेक अडचणी खासदारांच्या कानी घातल्या. जनतेचे प्रश्न तत्काळ सोडवा, असे निर्देश यावेळी खासदारांनी अधिकाऱ्यांना दिले.
या कार्यक्रमाला भाजपचे अहेरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाबुराव कोहळे, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, सिरोंचातील ज्येष्ठ नेते दामोधर अरगेला, सत्यनारायण मंचर्लावार, तालुका अध्यक्ष संदीप राचर्लावार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तहसीलदार मिश्रा, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, तालुका उपाध्यक्ष माधव कासर्लावार, राऊत, श्रीधर आणकरी, व्यंकटी गावडे, किरण कुलसंगे, सुरेजा जवाजी, राजेश्वरी बेझलवार, लक्ष्मी गुडदी, पोलीस निरीक्षक दीपक लुकडे आदी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यात सुरू करण्यात आलेले भारनियमन बंद करण्याच्या सूचना खासदारांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भारत संचार निगमची सेवा सुरळीत करण्यासोबत वनजमिनीचे पट्टे नागरिकांना त्वरित वितरित करावे, पुरामुळे नदीपात्रातील शेती वाहून गेली आहे, त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना खासदारांनी दिल्या. बैकन राजन्ना गटरू या शेतकऱ्याची म्हैस विजेच्या धक्क्याने मरणपावली. त्यांनाही मदत देण्याचे निर्देश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. सिरोंचा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्तपदे भरण्यासोबत आमडेली, पेंटीपाका येथे बीएसएनएलचे नवीन टॉवर उभारण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. धान्य साठवणासाठी ओटे व नवीन गोदाम बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. १५० नागरिकांच्या तक्रारी व सूचना यावेळी जनता दरबारात खासदारांनी जाणल्या. ८० तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
या कार्यक्रमात सागवान तस्करांना पकडून शासनाच्या स्वाधीन करण्याच्या कामात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आसरअल्ली येथील गजानन कलाक्षपवार यांचा खासदारांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बीडीओ मरस्कोल्हे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)