पक्षाची बूथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:22+5:302021-02-05T08:49:22+5:30

अहेरी : अहेरी तालुक्यासह संपूर्ण विधानसभा क्षेत्रात भाजप पक्षाची बूथ रचना मजबूत करावी, यासाठी कार्यकर्त्यांनी जाेमात कामाला लागावे, असे ...

Party booth | पक्षाची बूथ

पक्षाची बूथ

अहेरी : अहेरी तालुक्यासह संपूर्ण विधानसभा क्षेत्रात भाजप पक्षाची बूथ रचना मजबूत करावी, यासाठी कार्यकर्त्यांनी जाेमात कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश संघटन महामंत्री विजय पुराणिक यांनी केले. अहेरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत ते बाेलत हाेते.

याप्रसंगी खा. अशाेक नेते, आ. डाॅ. रामदास आंबटकर, आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवी ओल्लालवार, गोविंद सारडा, भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, जिल्हा उपाध्यक्ष विनोद अक्कनपल्लीवार, जिल्हा सचिव संदीप कोरेत, पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, अमोल गुडेल्लीवार, मुकेश नामेवार, पप्पू मद्दीवार, शंकर मगडीवार, श्रीनिवास चटारे, नागेश रेड्डी, नितीन गुंडावार, संजय अलोने, अभिजित शेंडे, नारायण सिडाम, दिलीप पडगेलवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

याप्रसंगी पक्ष संघटनाबाबत चर्चा करण्यात आली. विजय पुराणिक यांनी पक्ष संघटन कसे वाढवावे, भाजपची विचारधारा घराघरात कशी पाेहाेचवावी, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

Web Title: Party booth