शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

प्रवेश शुल्कवाढीने पालक झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM

गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात दीड हजार प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा मुख्यालय तसेच ११ ही तालुकास्थळी आणि मोठ्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. गल्लीबोळात कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशासनाचे नियम धाब्यावर : पुढील सत्रासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरोग्य सेवेप्रमाणेच शिक्षक क्षेत्र हे सेवेचे क्षेत्र आहे. मात्र बदलत्या काळात शिक्षण क्षेत्राचे सुद्धा व्यावसायिकरण झाले आहे. परिणामी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी केलेल्या विद्यार्थी प्रवेशशुल्क वाढीमुळे सर्वसामान्य पालक त्रस्त झाले आहेत. शुल्कवाढ व प्रवेश प्रक्रियेवर शिक्षण विभागाचे नियंत्रणच नसल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात दीड हजार प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा मुख्यालय तसेच ११ ही तालुकास्थळी आणि मोठ्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. गल्लीबोळात कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमांच्या या शाळांचे प्रवेश शुल्क कमी होते. मर्यादित शुल्क असल्याने सर्वसामान्य पालकांनाही आपल्या पाल्यांचा प्रवेश घेणे शक्य होते. मात्र २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून खासगी शाळांनी प्रवेश शुल्कात प्रचंड वाढ केली आहे.शहरातील नामांकित शाळा म्हणून प्रसिद्धी करणाऱ्या काही शाळांनी विद्यार्थी प्रवेश शुल्काचा उच्चांक गाठला आहे. नर्सरी, केजी-१, इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील प्रवेशासाठी २५ हजारपेक्षा अधिक शुल्क वर्षाकाठी आकारत आहेत. याशिवाय स्नेहसंमेलन, सहल, परीक्षा शुल्क तसेच पाठ्यपुस्तके, गणवेश इतर सर्व मिळून पाच ते सात हजार रुपये आकारले जात आहेत. एकूणच केजी-२ पासून इयत्ता चौथीपर्यंत पालकांना एका पाल्यामागे ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. ही सर्व रक्कम शिक्षण संस्थेच्या खात्यात जात असते.सन २०१३-१४ ते २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापर्यंत वाढीव फीमध्ये विभागीय नियामक शुल्क समितीमध्ये नियमबाह्य व अनियमितता आढल्यास शुल्क परत करावे, प्रलंबित शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे निकाल थांबवू नये, असे स्पष्ट आदेश नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी काढले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण