शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पलसगडची पाणी योजना निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

गटग्रामपंचायत पलसगड अंतर्गत येणाऱ्या मौशी, सलंगटोला व पलसगड या तीन गावांसाठी ही नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर नळ योजनेकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देएक वर्षापासून योजना बंद : लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा: कुरखेडा तालुक्याच्या पलसगड येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून टाकी उभारण्यात आली. तसेच नळ पाईपलाईन व इतर कामे करण्यात आली. मात्र सुरू झालेली ही नळ योजना सहा महिन्यांतच बंद पडली. गेल्या वर्षभरापासून नळ योजना बंद असल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.गटग्रामपंचायत पलसगड अंतर्गत येणाऱ्या मौशी, सलंगटोला व पलसगड या तीन गावांसाठी ही नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर नळ योजनेकडे दुर्लक्ष होत आहे.सदर नळ योजनेचे काम करताना निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आले तसेच साहित्यही निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले. त्यामुळे ही नळ योजना अल्पावधीतच बंद पडली आहे. परिणामी या योजनेवरील शासनाचा लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे. जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत प्रशासनाने उचित कारवाई करून सदर नळ योजना पूर्ववत सुरू करावी, नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पलसगड, सलंगटोला व मौशी या तीन गावातील नागरिकांनी केली आहे.कोट्यवधी खर्चुनही गावे तहानलेलीचजलस्वराज्य अभियानअंतर्गत कुरखेडा तालुक्यात अनेक गावांना पाणीपुरवठा योजना बांधून दिल्या. त्यावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. पाणीपुरवठा योजना चालविण्याची क्षमता नसलेल्या ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा योजना बांधून दिल्या. ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने योजनेत निर्माण झालेला बिघाड दुरूस्त करणे शक्य झाले नाही. तसेच काही ग्रामपंचायतींनी वीज बिल भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना काही गावांना करावा लागत आहे. गावातील पाणी टाकी शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपात