सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत घोट येथील नवोदय विद्यालयाच्या निनाद प्रशांत कांबळे या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. ...
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत २३८ जणांना कोरोनाने ग्रासले. मात्र त्यापैकी १८७ जणांची नोंद गडचिरोलीतील रुग्ण म्हणून करण्यात आली असून बाकी रुग्णांची नोंद त्यांच्या मूळ जिल्ह्यात व राज्यात करण् ...
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु प ...
मार्च महिन्याच्या अखेरीसपासून कोरोना संसर्गाची समस्या निर्माण झाली. सर्वप्रथम २२ मार्च रोजी देशपातळीवर जनता कर्फ्यू शासनाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कोरोनाविरूद्धची लढाई सुरू करण्यात आली. जिल्हा व राज्याच्या बाहेरून येणाऱ्या न ...
वैशिष्ट्यपूर्ण कामातून विशेष अनुदान योजनेंतर्गत स्टेट बँकेजवळ असलेल्या दुर्गा मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉकचे बांधकाम करण्याचा ठराव १६ ऑक्टोबर २०१८ च्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेने घेतला. त्यासाठी १८ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले. एका खा ...
ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे होते. मात्र १३ जुलैला राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार आता पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सदर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक जिल्ह्यात पाल ...
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) विविध बटालियनचे जवान गेल्या महिनाभरात सुट्यांवरून जिल्ह्यात परत आले आहेत. ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात होते. त्यापैकी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...
मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सादीकरण करा, आपण निधी देवू असा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन, आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावे ...
छत्तीसगड राज्यातून येणारी वाहने याच मार्गाने येतात. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गाने ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. कोसळलेली झाडे कायम असल्याने दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सदर झाडे हटविण्याकडे संबंधित वि ...
गेल्या दोेन दिवसांपासून अहेरी शहरासह तालुक्यात दमदार पाऊस बरसत आहे. अहेरी शहरातून खमनचेरूकडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय, एकलव्य स्कूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बीएसएनएल कार्यालय तसेच निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय शाळाही आहे ...