सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:50+5:30

यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे पीक पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे.

Outbreak of the disease on soybeans | सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा फवारणीवर भर : धान उत्पादक शेतकऱ्यांकडे तणनाशक फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या काही भागातील सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा पिकांवरील रोग नसून, सुरुवातीला या पिकाला कमी पाण्याची आवश्यकता असताना काही भागात पावसाचे पाणी शेतात साचल्याने पीके पिवळे पडत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. उगवलेल्या सोयाबिन पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे पीक पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारावर नियंत्रणासाठी शेतात साचत असलेले पाणी बाहेर काढावे. यामुळे पिकाचे संरक्षण होईल, शिवाय पिकाची चांगली वाढही होईल, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
चामोर्शी व आरमोरी तालुक्यात धान शेतीसोबतच सोयाबीन पिकाची शेती प्राधान्याने केली जात आहे. वैरागड भागात यंदा सोयाबीनची पेरणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे. सोयाबीन पिकाच्या शेतीला धानाच्या तुलनेत लागवडीचा खर्च कमी येत असल्याने अनेक शेतकरी आता सोयाबीन पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. पेरणी झाल्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस बरसला. सोयाबीनचे पीक उगवले असून त्यावर रोग दिसून येत आहे.

९३ हेक्टर क्षेत्रात उगवले सोयाबीनचे पीक
गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळूण एकूण २७१ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ९३ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, सिरोंचा या तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. वैरागड परिसरातील शेतजमीन सोयाबीन पिकासाठी पोषक असल्याने येथे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्यास्थितीत सोयाबीन अंकुरले असून पिकाला पाने दिसून येत आहेत. सोयाबीन पिकावरील रोग नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी, असे सांगितले जात आहे. काही धान उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील कचरा नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहेत.

Web Title: Outbreak of the disease on soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती