सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत निनाद कांबळे गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 04:56 PM2020-07-15T16:56:26+5:302020-07-15T16:56:48+5:30

सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत घोट येथील नवोदय विद्यालयाच्या निनाद प्रशांत कांबळे या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

Ninad Kamble from Gadchiroli district in CBSE Pattern X examination | सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत निनाद कांबळे गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम

सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत निनाद कांबळे गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत घोट येथील नवोदय विद्यालयाच्या निनाद प्रशांत कांबळे या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. जिल्ह्यातील चार शाळांमध्ये दहावीसाठी सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यात कारमेल स्कूल गडचिरोलीच्या २४ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. याशिवाय कारमेलच्या देसाईगंज येथील शाळेतील १९, स्कूल आॅफ स्कॉलर्स गडचिरोलीच्या १७ आणि नवोदय विद्यालय घोट येथील ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

Web Title: Ninad Kamble from Gadchiroli district in CBSE Pattern X examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.