झाडे कोसळल्याने मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:25+5:30

छत्तीसगड राज्यातून येणारी वाहने याच मार्गाने येतात. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गाने ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. कोसळलेली झाडे कायम असल्याने दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सदर झाडे हटविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Roads closed due to falling trees | झाडे कोसळल्याने मार्ग बंद

झाडे कोसळल्याने मार्ग बंद

Next
ठळक मुद्देरांगी-धानोरा मार्र्ग : परिसरातील वाहनधारक त्रस्त; जपतलाईमार्गे सुरू आहे वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : रांगी-धानोरा हा राज्यमार्ग असल्याने येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मागील आठवड्यात वादळी पाऊस झाला. या पावसामुळे मार्गावर परिसरात ठिकठिकाणी झाडे कोसळली. मोहली ते पुसावंडी दरम्यान तीन झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. सदर झाडे अद्यापही हटविण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना धानोरा-जपतलाई-मोहली या मार्गाने जावे लागत आहे.
छत्तीसगड राज्यातून येणारी वाहने याच मार्गाने येतात. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गाने ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. कोसळलेली झाडे कायम असल्याने दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सदर झाडे हटविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या हा मार्ग बंद झाला असून या मार्गाची वाहतूक धानोरा-जपतलाई-मोहली या मार्गाने करावी लागत आहे.
यात प्रवासी व वाहनधारकांना अधिकचा फेरा होत आहे. परिणामी अधिकचे इंधन खर्च होत आहे. त्यामुळे या मार्गावरील झाडे हटवून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अर्धवट डांबरीकरण निमगाव मार्ग खड्डेमय
धानोरा तालुक्यातील रांगी ते निमगाव मार्गावर बोरी फाट्यापासून निमगावपर्यंत दोन किमी माार्गाचे मार्च महिन्यातच डांबरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. अपूर्ण बांधकामामुळे सध्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील आठ वर्षांपासून या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्षच झाले.
रांगी ते निमगावपर्यंतचे अंतर ४ किलोमीटर आहे. बोरी फाट्यापासून निमगावपर्यंतचे अंतर २ किमी आहे. मात्र या मार्गावर अर्धवट डांबरीकरण केले आहे. उर्वरित रस्ता तसाच सोडून दिला आहे. डांबरीकरण न झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांतील खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. गंभीर अपघात घडण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केलीआहे.

Web Title: Roads closed due to falling trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस