देसाईगंज तालुक्यातील गावसंघटनेच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. आरमोरी पोलीस ठाण्यात शहरातील व किटाळी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक बोंडसे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांना राखी ...
या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर ...
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआ ...
आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने ना ...
१३ नवीन लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये आरमोरी येथील ३ एसआरपीएफ जवान, गडचिरोलीतील १ सीआरपीएफ व १ एसआरपीएफ जवान, एटापल्ली येथील १ पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालयातील १ परिचारिका व १ रूग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्वी कोरोनाबाधित आलेल्या रूग्ण ...
कोरचीला देवरी व कुरखेडावरून वीज पुरवठा केला जाते. ३३ केव्ही उपकेंद्राला २० ते २२ केव्ही दाबाचा वीज पुरवठा केला जातो. परिणामी विद्युत ब्रेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. ढोलडोंगरी येथे २०१२ मध्य ...
ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात. आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर ...
सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही ...