सावधान, वाघाचे वास्तव्य आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:19+5:30

आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत.

Beware, the tiger is living! | सावधान, वाघाचे वास्तव्य आहे!

सावधान, वाघाचे वास्तव्य आहे!

googlenewsNext
ठळक मुद्देदेवलमरी मार्गावर लावले फलक : दोन कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेलया देवलमरी-कोतागुडम रस्त्यावर मागील काही दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यासाठी या मार्गावर वनविभागाने ठिकठिकाणी फलक लावले आहेत.
आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी घराबाहेर पडावेच लागते. अशातच वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरीवर्गामध्ये दहशत निर्माण झाली आहे. देवलमरी, रंकलगुंडी व कोत्तागुडम या तीन ठिकाणी धबधबे आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी पडत असल्याने येथील निसर्ग सौंदर्य आणखीनच फुलते. हे निसर्ग सौंदर्य पाहण्याबरोबरच आंघोळीचा आनंद लुटण्यासाठी अनेक युवक या धबधब्यांवर जातात. हे तीनही धबधबे जंगल परिसरात आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकºयांनी वाघाच्या वास्तव्याची माहिती वनविभागाला दिली. तसेच लोकमतनेही २९ जुलै रोजी वाघाच्या छायाचित्रासह बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय रेपनपल्लीतर्फे या परिसरात वाघ असल्याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी दोन वनकर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकही थोडे सावध झाले आहेत.

रोवणीच्या कामांवर परिणाम
देवलमरी परिसरात धान रोवणीची कामे सुरू आहेत. शेतकरी सकाळीच जाऊन रात्री उशिरापर्यंत परत येत होते. मात्र वाघामुळे शेतातून लवकरच घरी परत यावे लागत आहे. तसेच सकाळी ८ ते ९ वाजताशिवाय शेतकरी शेतात पोहोचत नाही. याचा परिणाम धानाच्या रोवण्यांवर झाला आहे. रोवणी झाल्यानंतरही शेतीकडे शेतकऱ्यांना जावेच लागणार आहे. यापूर्वीही वाघाने गावातील जनावरांना फस्त केले आहे. त्यामुळे वाघाकडून मानवावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. वनविभागाने या भागात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. तसेच नागरिकांमध्ये वाघाच्या वास्तव्याविषयी जागृती केली जात आहे.

Web Title: Beware, the tiger is living!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.