शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दोनच शाळा अनुदानासाठी पात्र

By admin | Updated: May 15, 2014 02:06 IST

शासनाच्या निर्देशानुसार व अनुदानाच्या निकषानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी व्यवस्थापनाच्या ५६ माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविल्या आहेत.

शिक्षण : त्रुट्या दुरूस्त करून २७ शाळांचे सुधारित प्रस्ताव उपसंचालकांकडे सादर गडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार व अनुदानाच्या निकषानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी व्यवस्थापनाच्या ५६ माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविल्या आहेत. जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाने अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या अनेक शाळांपैकी केवळ जिल्ह्यातील दोन माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र या संबंधीचे लेखी पत्र संबंधित शाळांना अद्यापही प्राप्त झाले नसल्याची माहिती प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी लोकमतला दिली आहे.शासनाच्यावतीने दरवर्षी शाळांना अनुदानाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या अनेक शाळांमार्फत अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले जातात. सदर प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. संबंधित शाळांनी शाळांबाबतची सर्व माहिती ठरलेल्या प्रारूपमध्ये सादर करावयाची असते. या प्रारूपमध्ये शाळांची विद्यार्थी पटसंख्या, विशिष्ट दिवसाची उपस्थित विद्यार्थीसंख्या, शाळेतील भौतिक सुविधा, प्रयोग शाळा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची पदभरती, बिंदू नामावली, शाळेची संरक्षण भिंत, क्रिडांगण, बगीचा, मुत्रीघर, शौचालय याबाबतची माहिती प्रस्तावामध्ये सादर करायची असते.शासनाच्या निर्देशानुसार भरलेल्या माहितीच्या आधारे त्या शाळांना गुण दिले जातात. शाळांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्याची एक प्रत शिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर केली जाते. शिक्षणाधिकारी त्यांच्याकडे प्राप्त झालेली माहिती व ऑनलाईन शासनाकडे सादर केलेली माहिती बरोबर आहे काय, याची शहानिशा करतात. त्यानंतर अनुदानासाठी शाळांना निकषाचा विचार करून पात्र ठरविले जाते. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत एप्रिल २0१४ च्या अखेरीस त्रुट्यांमध्ये सुधारणा करून जिल्ह्यातील २७ खाजगी माध्यमिक शाळांचे अनुदानाबाबतचे प्रस्ताव नागपूर येथील विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे. या २७ शाळांच्या प्रस्तावावर काय कार्यवाही होते, याकडे शिक्षकांचे लक्ष आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

■ गुणवत्ता प्रतीक्षा यादीत नावे असलेल्या राज्यातील २ हजार ८0 उमेदवारांची शिक्षक पदभरती करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहे. गुणवत्ता प्रतीक्षा यादीचा विचार करून सर्व जिल्हे मिळून २ हजार ८0 शिक्षक पदभरती होणार आहे. शाळांच्या विद्यार्थीपटसंख्येनुसार शिक्षकांची पदे निश्‍चित होत असतात. २0११ साली झालेल्या पटपडताळणी मोहिमेदरम्यान ५0 टक्केच्या आत विद्यार्थी पटसंख्या आढळेलेल्या शाळांचे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे राज्यभरात गेल्या अनेक दिवसापासून समायोजन सुरूआहे. समायोजन प्रक्रिया व प्रतीक्षा यादीतील भरती प्रक्रिया होईपर्यंत अनुदानित शाळांची शिक्षक भरती बंद आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीला मान्यता आहे.