शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील विद्यार्थ्यांची माहिती मिळणार एका क्लिकवर

By admin | Updated: July 12, 2015 02:09 IST

राज्यभरातील शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीद्वारे भरून घेतली जाणार असून दोन महिन्यानंतर ...


गडचिरोली : राज्यभरातील शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीद्वारे भरून घेतली जाणार असून दोन महिन्यानंतर ही संपूर्ण माहिती राज्य शासनाला केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
इतर विभागांच्या तुलनेत शिक्षण विभागाचा पसारा अत्यंत व्यापक आहे. कोट्यवधी विद्यार्थी, लाखो शिक्षक व हजारो शाळा राज्यामध्ये कार्यरत आहेत. यावर राज्य शासनाचे महिन्याला हजारो कोटी रूपये खर्च होतात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये बदलही केला जातो. हे सर्व करण्यासाठी विद्यार्थी, शाळा व शिक्षकांची माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र कागदोपत्री ही माहिती उपलब्ध करून देताना बरीच अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘सरल’ ही संगणक प्रणाली तयार केली आहे. या संगणक प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची जबाबदारी वर्गशिक्षकावर सोपविण्यात आली आहे. शाळा व शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक भरणार आहेत. प्रत्येकाला लॉगीनआयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. वर्गशिक्षक, विद्यार्थ्यांची संख्या, जन्म तारीख, आधारकार्ड क्रमांक, पालकाच्या बँकेचा खाते क्रमांक, नव्याने दाखल होणारी मुले, शाळा सोडलेले विद्यार्थी आदी माहिती भरणार आहे.
शाळेविषयीची माहिती भरताना शाळेचा प्रकार, व्यवस्थापन, शाळा मान्यता, माध्यम, पत्ता, संपर्क व्यक्तीचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा, शाळा तपासणी, शाळांना मिळालेले अनुदान, त्याचा विनियोग आदी माहिती भरली जाणार आहे. कर्मचारी पोर्टलमध्ये कर्मचाऱ्यांसदर्भात माहिती भरली जाणार आहे. एवढेच नाही तर संबंधित कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक सुद्धा आॅनलाईनच राहणार आहे. सदर सेवापुस्तक भरण्याचे अधिकार मुख्याध्यापकाला देण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे शिक्षण विभागाचा कारभार गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिक्षक व पालकांकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)