शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे अधिकारी भामरागडात अडकले

By admin | Updated: September 20, 2015 02:00 IST

१६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.

चालक वाहकांनाही प्रचंड मनस्ताप : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याही थांबल्याभामरागड : १६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांना पूर आल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक जवळजवळ दोन ते अडीच दिवस बंद होती. या कालावधीत नागपूर येथील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे उपायुक्त श्रीकांत धर्माळे व गडचिरोलीचे जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे दोन दिवस भामरागडातच पुरामुळे अडकून पडले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या पाच ते सहा बसगाड्याही दोन ते अडीच दिवस अडकून पडल्या होत्या. १६ सप्टेंबर रोजी उपायुक्त धर्माळे व नियोजन अधिकारी सुटे हे आलापल्ली निसर्ग पर्यटन विकासाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. भामरागड येथेही त्यांना काम असल्याने दोन्ही अधिकारी भामरागड कडे जाण्यास निघाले. मात्र ताडगाव येथील नाल्याला पाणी होते. सदर पाणी काही वेळात ओसरल्यानंतर ते सायंकाळी भामरागडला पोहोचले. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळे भामरागडलगतच्या पुलावर पाणी चढून आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला. सतत संततधार पाऊस राहिल्याने १७ व १८ सप्टेंबरलाही पूर ओसरला नाही. १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या पुराचे पाणी ओसरल्यावर हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी आलापल्लीकडे रवाना झाले. याच काळात राज्य परिवहन महामंडळाच्या लाहेरी, भामरागड, कोठीकडे गेलेल्या सात ते आठ बसगाड्याही अडकून पडल्या होत्या. जसजसे पुराचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. तसे या बसगाड्यांनी भामरागड गाठले व १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या बसगाड्या अहेरीकडे रवाना झाल्या. तब्बल अडीच ते तीन दिवस पुरामुळे एसटीवाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. भामरागड जवळचा ठेंगण्या पुलावर वारंवार पाणी येत असल्याने हा मार्ग बंद होतो.