बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा संकेतस्थळावर उल्लेख कायमच

By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:13+5:302015-06-14T01:54:13+5:30

गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातून यावर्षी बदली झालेल्या विविध अधिकाऱ्यांचा उल्लेख अजूनही कायमच असल्याचे दिसून येत आहे.

On the official website of the transferred officers, there is always mention on the website | बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा संकेतस्थळावर उल्लेख कायमच

बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा संकेतस्थळावर उल्लेख कायमच

प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांची होत आहे दिशाभूल
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातून यावर्षी बदली झालेल्या विविध अधिकाऱ्यांचा उल्लेख अजूनही कायमच असल्याचे दिसून येत आहे.
अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीरामे यांची बदली झाली. मात्र संकेतस्थळावर त्यांचे नाव झळकत आहे. गडचिरोलीचे जिल्हा सहाय्यक निबंधक जयेश आहेर यांचीही बदली झाली. मात्र त्यांचेही नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर झळकत आहे. गोंडवाना विद्यापीठाला डॉ. मुरलीधर चांदेकर हे नवे प्रभारी कुलगुरू मिळाले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांचे नाव अजूनही झळकत आहे. ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांची यशदा पुणे येथे बदली झाली. मात्र त्यांचे नाव अजूनही संकेतस्थळावर कायम आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कापसे यांची बदली झाली. मात्र त्यांचेही नाव या संकेतस्थळावर झळकत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: On the official website of the transferred officers, there is always mention on the website