निवासस्थानांमध्ये कार्यालये

By Admin | Updated: May 15, 2014 23:34 IST2014-05-15T23:34:35+5:302014-05-15T23:34:35+5:30

तालुक्यातील बहुतांश कार्यालयांना स्वत:च्या इमारती नसल्याने कर्मचार्‍यांच्या निवासस्थानात सुरू असून यामध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे.

Offices at the residences | निवासस्थानांमध्ये कार्यालये

निवासस्थानांमध्ये कार्यालये

कुरखेडा : तालुक्यातील बहुतांश कार्यालयांना स्वत:च्या इमारती नसल्याने कर्मचार्‍यांच्या निवासस्थानात सुरू असून यामध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे. शासनाने या कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारत बांधून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

कुरखेडा येथे व कुरखेडा तालुक्यात नोकरी करणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने बांधून दिली आहेत. मात्र या निवासस्थानामध्ये एकही कर्मचारी राहत नाही. त्यामुळे ही निवासस्थाने पडीत आहेत. यातील एका निवासस्थानामध्ये जिल्हा परिषदेच्या उपविभागीय कार्यालय तर दुसर्‍यामध्ये हत्तीरोग निरीक्षक व हत्तीपाय आरोग्य पर्यवेक्षकाचे कार्यालय थाटले आहे. पंचायत समितीच्या एका गोदामात जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभाग तर दुसर्‍या गोदामात जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे कार्यालय आहे. या इमारती अत्यंत जुन्या असल्याने यांच्यामध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे.

निवासस्थानावरील कवेलू फुटले असल्याने पावसाळ्यामध्ये या कार्यालयामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी थिपकते. त्यामुळे महत्वाचे दस्तावेज नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्युतची फिटींग योग्य नसल्याने संगणकामध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत आहे. त्याचबरोबर शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने या ठिकाणच्या कर्मचार्‍यांना व नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Offices at the residences