शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा

By admin | Updated: September 9, 2016 01:19 IST

विकासाच्या संदर्भात अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.

क्रिष्णा गजबे यांचे प्रतिपादन : आरमोरी पं.स.च्या आमसभेत वादळी चर्चाआरमोरी : विकासाच्या संदर्भात अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. या समन्वयातूनच समस्या उद्भवणारे प्रश्न मार्गी लावता येतात. सरपंच व गावातील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी गावाच्या समस्या व विकासा संदर्भातील प्रश्न अधिकारी व पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन या संदर्भात पाठपुरावा करावा. विकासकामांच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार क्रिष्णा गजबे यांनी वार्षिक आमसभेत दिला.आरमोरी पंचायत समितीची सन २०१५-१६ व सन २०१६-१७ ची वार्षिक आमसभा स्थानिक राजीव भवनाच्या सभागृहात आमदार क्रिष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडली. आमसभेला आरमोरी पंचायत समितीचे सभापती सविता भोयर, जि.प. सदस्या लक्ष्मी मने, कुसूम रणदिवे, पुनम गुरनुले, तहसीलदार मनोहर वलथरे, संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सजनपवार, सहायक संवर्ग विकास अधिकारी मनोहर निमजे, पंचायत समिती सदस्य नानू चुधरी, सचिन महाजन, भारत बावणथडे, नंदू पट्टेवार, बबलू ताडाम यांच्यासह पंचायत समिती सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमसभेला गैरहजर असतील, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मागील आमसभेचे अहवाल वाचन सहायक संवर्ग विकास अधिकारी मनोहर निमजे यांनी केले. मागील सभेत उपस्थित झालेले मुद्दे निकाली लागले किंवा नाही याचाही आढावा घेण्यात आला. वार्षिक आमसभेत विविध मुद्यांवर वादळी चर्चा झाली. आरमोरी क्रीडा संकुलाची दुरावस्थेची चौकशी करण्याचे निर्देश दिले. मुदतबाह्य हॅन्डवॉश प्रकरणी गट शिक्षणाधिकारी परसा यांच्या वेतनातून हॅन्डवॉश बॉटलची रक्कम वसूल करावी, वघाळा, सायगाव येथील गैरहजर शिक्षकांवर कारवाई करावी, शिक्षण विभागाकडे गट शिक्षणाधिकारी परसा यांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचा ठराव घेतला. वघाळा गावची सिमांकन, शाळा व अंगणवाडी इमारतींचे निर्लेखन, निकृष्ट आहार, रेंगाळलेली कामे याबाबत ठराव घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. (वार्ताहर)