शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढीसाठी आता सात कलमी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:23 IST

शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देदुप्पट वाढीचे लक्ष्य : शेतीसह प्रक्रिया उद्योगाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्रासह कृषी विभागाकडून पुरविले जाईल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र सोनापूर (गडचिरोली)चे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प ते सिद्धी’ या कार्यक्रमाचे आयोजन येत्या ३१ आॅगस्टला गडचिरोलीत करण्यात आले आहे. त्यात शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी राबविल्या जाणाºया सात कलमी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम राबविताना समन्वयकाची भूमिका कृषी विज्ञान केंद्राला पार पाडायची आहे. शेतकºयांमध्ये जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सदर कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राकडे देण्यात आली असल्याचे डॉ.तांबे यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी राबवायच्या सात कलमी कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाकडून केले जाणार आहे.त्याबाबत अधिक माहिती देताना डॉ.तांबे यांनी सांगितले, गडचिरोली जिल्ह्यात दुग्ध उत्पादनासह इतर अनेक गोष्टीतून उत्पन्न वाढीसाठी भरपूर वाव आहे. परंतू पुरेशा माहितीचा अभाव आणि गैरसमज यामुळे लोक त्याकडे वळलेले नाहीत. त्यांना यासाठी प्रवृत्त करून आधुनिक शेतीकडे त्यांचा कल वाढविणे, चांगले बियाणे शेतकºयांना मिळतील यासाठी त्यांची गुणवता वेळोवेळी तपासून शेतकºयांची फसवणूक थांबविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.३१ आॅगस्टला होणाºया कार्यक्रमात शेतकºयांना कृषी शास्त्रज्ञांचेही मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ.डी.एम. मानकर राहणार आहेत. पत्रपरिषदेला डॉ.विजय कदम, ज्ञानेश्वर नाथाडे, डॉ.अनिल तारू, योगिता सानप, पुष्पक बोथीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.