शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर पदाधिकाऱ्यांना नोटीस

By admin | Updated: July 15, 2015 01:54 IST

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ जुलै रोजी

काँग्रेसचे शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन : उसेंडींनी दिले कारवाईचे संकेत
गडचिरोली : प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ जुलै रोजी गुरूवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. मात्र या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले अशा पदाधिकाऱ्यांना पक्षातर्फे नोटीस बजाविण्यात आली असून सात दिवसांच्या आत त्यांच्याकडून समाधारकारक उत्तर प्राप्त न झाल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांनी पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली आहे.
माजी आ. डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकून अनेक पदाधिकारी राजकीय पदाचा उपभोग घेत आहेत. मात्र गुरूवारी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या बैलबंडी मोर्चात अनेक पदाधिकारी अनुपस्थित होते. पक्षाचा फायदा घ्यायचा व पक्ष धोरणाच्या कार्यक्रमात उपस्थित न राहणे ही बाब पक्ष धोरणाविरोधी आहे. यामुळे पक्ष संघटन वाढीस अडथळा निर्माण होतो. तसेच काँग्रेस पक्षात सक्रीय काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊन पक्ष बांधणी व पक्ष वाढीसाठी अडथळा निर्माण होते. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहणे ही बाब योग्य नाही, असेही माजी आ. डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी गैरहजर आढळून आल्यास आपण त्यांची गय करणार नाही, असा इशारा डॉ. उसेंडी यांनी दिला आहे. त्यामुळे मोर्चात गैरहजर असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.