दुर्गम भागातील नागरिकांसाेबत नववर्षाचा जल्लाेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:45+5:302021-01-08T05:58:45+5:30

भामरागड : उपपोलीस स्थानक, लाहेरीच्या वतीने लाहेरी येथे शस्त्र प्रदर्शन, तर गोपणार येथे नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. ...

New Year celebrations with citizens in remote areas | दुर्गम भागातील नागरिकांसाेबत नववर्षाचा जल्लाेष

दुर्गम भागातील नागरिकांसाेबत नववर्षाचा जल्लाेष

भामरागड : उपपोलीस स्थानक, लाहेरीच्या वतीने लाहेरी येथे शस्त्र प्रदर्शन, तर गोपणार येथे नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यानिमित्ताने दुर्गम भागातील नागरिकांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. पाेलिसांच्या वतीने लाहेरीसारख्या अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती व्हावी, यासाठी लाहेरी येथे शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते.

यावेळी जिज्ञासू विद्यार्थ्यांनी शस्त्रांचे बारकाईने निरीक्षण केले, तर पालीस उपनिरीक्षक राठोड व इतर पोलीस अंमलदारांनी त्यांना सोप्या भाषेत शस्त्रांची माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोलीस स्थानकाच्या दैनंदिन कामकाजाचीदेखील माहिती घेतली. तर नक्सलविरोधी अभियान राबविण्यासाठी गेलेले प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी अभियान दलासह लाहेरी डोंगर रांगा व पामुलगौतम नदीच्या सानिध्यात वसलेल्या अतिदुर्गम गोपणार गावास भेट दिली. याप्रसंगी त्यांनी नागरिकांसाेबत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी प्रभारी अधिकाऱ्यांनी उपस्थितांना शांतता व सौहार्दाचा संदेश देत शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी सीआरपीएफ ३७ बटालियनचे संतोष भोसले, पीएसआय विजय सपकाळ, महादेव भालेराव, पाेलीस हवालदार अरुण टेकाम, पाेलीस नाईक फिरोज गाठले, यशवंत दाणी, शिपाई ईश्वरलाल नैताम, नितीन कुमरे उपस्थित होते.

Web Title: New Year celebrations with citizens in remote areas