वर्तमानपत्रातूनच नवा समाज घडत असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:58+5:302021-01-08T05:58:58+5:30

अहेरी : समाज घडविण्याचे व्रत पत्रकारांनी जाेपासले पाहिजे. समाजाला दिशा दाखविण्याचे काम पत्रकारांकडून हाेत असते. वर्तमानातूनच नवा समाज ...

New society is happening through newspapers | वर्तमानपत्रातूनच नवा समाज घडत असतो

वर्तमानपत्रातूनच नवा समाज घडत असतो

अहेरी : समाज घडविण्याचे व्रत पत्रकारांनी जाेपासले पाहिजे. समाजाला दिशा दाखविण्याचे काम पत्रकारांकडून हाेत असते. वर्तमानातूनच नवा समाज घडत असताे, असे प्रतिपादन आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

स्थानिक भगवंतराव महाविद्यालयात बुधवारी पत्रकार दिन अहेरी पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित सेवाव्रतींच्या सत्कार कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून ते बाेलत हाेते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अहेरी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र अलोने होते. सत्कारमूर्ती म्हणून मंचावर तहसीलदार ओंकार ओतारी, डॉ.पार्वती कायल, ज्येष्ठ पत्रकार ए.आर.खान आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना आ.धर्मराबाबा आत्राम म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारिता हे जोखीम व जिकरीचे कार्य असून माध्यमे व वर्तमानपत्रे हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने लोकशाहीला मजबूतपणे टिकवून ठेवण्याचे महान कार्य पत्रकार करीत असतात, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक पत्रकार प्रकाश दुर्गे, संचालन दीपक सुनतकर यांनी तर आभार ऋषी सुखदेवे यांनी मानले.

बाॅक्स...

यांचा झाला गाैरव

अहेरी पत्रकार संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक सेवाव्रतींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, डायरी व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये आ.धर्मरावबाबा आत्राम, काेराेना याेद्धा म्हणून तहसीलदार ओंकार ओतारी, वैद्यकीय अधिकारी डाॅ.पार्वती कायल, पाेलीस उपनिरीक्षक रूपाली काळे, आरती नराेटे, रेगुंठा येथील महिला टॅक्सीचालक किरण कुर्मावार, आशावर्कर रूकसार शेख, ज्येष्ठ पत्रकार ए.आर.खान आदींचा समावेश आहे.

Web Title: New society is happening through newspapers