शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १.१२ कोटीच्या रकमेचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

तहसीलदार कल्याणकुमार डहाट आणि स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांसमक्ष त्या रकमेची मोजणी केली असता वाहनात १ कोटी १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम तेंदूपत्त्याची मजुरी देण्यासाठी नेली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यावर पोलिसांनी अद्याप तरी विश्वास ठेवलेला नसल्याचे दिसून येते. या प्रकरणाचा तपास सुरूच असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतनसिंह चौहान यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले.

ठळक मुद्देचौकशी सुरूच : २४ तासानंतरही निष्कर्ष नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गोंदियाकडून एका वाहनातून आलेल्या १ कोटी १२ लाख रुपयांच्या रकमेचे गूढ उकलण्यात आरमोरी पोलिसांना २४ तासानंतरही यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य आणखीच वाढले असून ही रक्कम नेमकी कुठे आणि कशासाठी जात होती हे याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
देसाईगंज मार्गावरील कोसा विकास केंद्राजवळ नाकेबंदीदरम्यान गुरूवारी (दि.११) आरमोरी पोलिसांनी गोंदियावरून आलेली एमएच ३५, पी ९००१ ही कार पकडली. तपासणी केल्यानंतर आतमध्ये मोठी रोकड मिळाली.
तहसीलदार कल्याणकुमार डहाट आणि स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांसमक्ष त्या रकमेची मोजणी केली असता वाहनात १ कोटी १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम तेंदूपत्त्याची मजुरी देण्यासाठी नेली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यावर पोलिसांनी अद्याप तरी विश्वास ठेवलेला नसल्याचे दिसून येते. या प्रकरणाचा तपास सुरूच असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतनसिंह चौहान यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले.
सिरोंचा येथे नक्षल्यांसाठी जात असलेली रक्कम पकडल्यानंतर सर्वच ठिकाणचे पोलीस सक्रिय झाले आहेत.

कारमध्ये ग्रामसभांची रक्कम बुडविणारा कंत्राटदार
पोलिसांनी जप्त केलेल्या त्या कारमध्ये संजय किशोर टेहर (५४), स्नेहल बिपीनभाई पटेल (४५), समीर कयुम कुरेशी तिघेही रा.गोंदिया हे तिघे होते. यापैकी स्रेहल पटेल हे तेंदू कंत्राटदार असून त्यांनी २०१७ मधील कंत्राटापोटी ५ ग्रामसभांची ६ कोटी रुपयांची रॉयल्टी अद्याप दिलेली नाही. त्यासाठी वनविभागाने सदर कंत्राटदाराचे हे वाहनही गडचिरोलीच्या वन नाक्यावर अडविले होते. शुक्रवारी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सोडून दिल्याचे समजते. त्याच प्रकरणातील कंत्राटदाराला आता एवढ्या मोठ्या रकमेसह आरमोरीत पकडण्यात आले.

टॅग्स :MONEYपैसाforest departmentवनविभाग