आरमोरीत मुक्तिपथ तालुका समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:01+5:302021-01-08T05:58:01+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा दारूमुक्त करण्यासाठी जनतेच्या सहकार्याने मुक्तिपथचे प्रयत्न सुरु आहेत. दारू वाटणे किंवा पाजणे ...

Muktipath taluka committee meeting in Armori | आरमोरीत मुक्तिपथ तालुका समितीची बैठक

आरमोरीत मुक्तिपथ तालुका समितीची बैठक

लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा दारूमुक्त करण्यासाठी जनतेच्या सहकार्याने मुक्तिपथचे प्रयत्न सुरु आहेत. दारू वाटणे किंवा पाजणे हा निवडणुकीच्या नियंत्रणाचा भंग होईल. हा गुन्हा आहे. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांतीपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक ही पूर्णतः दारूमुक्त व्हावी, यासाठी गावागावात ठराव घेऊन मागणी केली जात आहे. मुक्तिपथ तालुका चमूच्या माध्यमातून गावागावात दारूमुक्त निवडणूकसंदर्भात जनजागृती केल्या जात आहे. स्थानिक प्रशासनानेसुद्धा दारूचे वाटप होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांकडून ‘मी दारूचे वाटप करणार नाही,’ अशा आशयाचे संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत. गाव विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व मुक्तिपथ संयुक्तरीत्या दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होती.

Web Title: Muktipath taluka committee meeting in Armori